नसरापूर शाळेत लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:35+5:302021-04-10T04:10:35+5:30

आरोग्य केंद्राची इमारत लहान असल्याने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरीकांना थांबावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी ...

Vaccination started at Nasrapur school | नसरापूर शाळेत लसीकरणास सुरुवात

नसरापूर शाळेत लसीकरणास सुरुवात

Next

आरोग्य केंद्राची इमारत लहान असल्याने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरीकांना थांबावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी नसरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी यांच्याशी चर्चा करून आरोग्य केंद्रातील लसीकरण विभाग जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

या वेळी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे उपसभापती लहु शेलार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजय कुलकर्णी, विस्तार अधिकारी राम राठोड, राजेंद्र चांदगुडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल मालुसरे, नसरापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, डॉ. मिलींद आहिरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम,सुधीर वाल्हेकर उपस्थित होते.

०९ नसरापूर

नसरापूर येथे सुरु असलेले लसीकरण

Web Title: Vaccination started at Nasrapur school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.