पिंपळी येथे लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:44+5:302021-04-04T04:09:44+5:30
दरम्यान पिंपळी-लिमटेक येथील ४५ वर्षांवरील सर्व पुरुष,महिला व वयोवृद्ध अशा १२१ नागरिकांना कोविड शिल्डही लस मोफत देण्यात आली. पहिल्या ...
दरम्यान पिंपळी-लिमटेक येथील ४५ वर्षांवरील सर्व पुरुष,महिला व वयोवृद्ध अशा १२१ नागरिकांना कोविड शिल्डही लस मोफत देण्यात आली. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस एक ते दीड महिन्याच्या अंतरात देण्यात येणार आहे, ही लस घेतल्या नंतर वाढता संसर्ग मोडीत काढण्यासाठी मदत होऊन साखळी खंडित होईल, वाढता प्रादुर्भाव कमी होईल अशी माहिती पिंपळी आरोग्यवर्धिनी विभागाचे सी.एच.ओ.डॉ.दीपाली शिंदे यांनी दिली. यावेळी संचालक संतोष ढवाण,सरपंच मंगल केसकर,ग्रामविकास अधिकारी अन्सार सय्यद,तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनील बनसोडे,अशोक ढवाण-पाटील,सदस्य आबासाहेब देवकाते,अजित थोरात, हरिभाऊ केसकर,सोना देवकाते-पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनकर, आरोग्यवर्धिनी विभागाचे सी.एच.ओ.डॉ.दीपाली शिंदे, आरोग्य सेवक डॉ.राहुल घुले,आरोग्य सेविका डॉ.नफिसा तांबोळी, काटेवाडी केंद्र एल एच व्ही रणवरे.एस.आर,ढेकळवाडी केंद्र आरोग्य सेविका लिंबकर एम.व्ही. काटेवाडी केंद्र बी.एफ.धायगुडे एस. जे. व आशा वर्कर अलका चांडे, कविता गोसावी, रेखा तांबे,संगिता गिरमे आणि लसीकरणसाठी पिंपळी येथील श्रीमती हौसाबाई घोरपडे विद्यालयातील शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
पिंपळीत नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
०३०४२०२१-बारामती-०६
---------------------------