उरुळी कांचन येथे लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:01+5:302021-03-13T04:18:01+5:30
४५ वर्षापेक्षा अधिक व ५९ वर्षेपर्यंत वय असलेल्या व दुर्धर व्याधीग्रस्त नागरिकांना आजाराचे प्रमाणपत्र दाखवल्यावर ज्येष्ठ नागरिकांसारखे लसीकरण ...
४५ वर्षापेक्षा अधिक व ५९ वर्षेपर्यंत वय असलेल्या व दुर्धर व्याधीग्रस्त नागरिकांना आजाराचे प्रमाणपत्र दाखवल्यावर ज्येष्ठ नागरिकांसारखे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता कदम यांनी दिली.
आठवड्यातून सोमवार, बुधवार, व शुक्रवार असे तीन दिवस लस देण्यात येणार असून त्या दिवशी २०० नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण होणार असल्याची माहिती सरपंच संतोष कांचन यांनी दिली व आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
सोमवारी झालेल्या बैठकीत लसीकरणासंदर्भात माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष नावनोंदणी ही लसीकरण केंद्रावर व मोबाईल ॲपवर घरीपण करता येईल. नोंदणी वेळी ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल तसेच मोबाईल वर ओटीपी आल्यानंतर लाभार्थ्याची पडताळणी पूर्ण होईल. त्यासाठी मोबाईल जवळ असणे आवश्यक आहे, एका मोबाईल वर घरातील चार व्यक्तीच्या नावाची नोंदणी होऊ शकते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या, हेमलता बडेकर, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता कदम, डॉ. राजश्री सूर्यवंशी, डॉ.संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.
११ उरुळी काचंन लसीकरण
ज्येष्ठ नागरिकाला लस टोचताना आरोग्य कर्मचारी. यावेळी उपस्थित संतोष कांचन, अमित कांचन.