वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:35+5:302021-04-06T04:10:35+5:30

या मोहिमेचे उद्धघाटन वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी केले. यावेळी यावेळी मनुष्यबळ विभाग ...

Vaccination started in Walchandnagar industry | वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये लसीकरणाला सुरुवात

वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये लसीकरणाला सुरुवात

googlenewsNext

या मोहिमेचे उद्धघाटन वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी केले. यावेळी यावेळी मनुष्यबळ विभाग अधिकारी धिरज केसकर, व्हायस प्रेसिडेंट पवनकुमार जैन,संजय गायकवाड, अमोल बर्गे, राहुल माने,सुरक्षा विभाग अधिकारी शैलेश फडतरे,नंदकुमार गोंडगे,प्रविण बल्लाळ, आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश विरकर, डॉ. किसन हेगडकर, आरोग्य सहाय्यक राहुल देवकर, आरोग्य सेवक उमेश गवळी, अतुल कांबळे आरोग्य सेविका सुवर्णा शिरसट, स्मिता साठे, मुजावर शहनाज आदी उपस्थित होते.

चिराग दोशी म्हणाले, कोरोनाला गांभीर्याने घेऊन सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. लसीकरण मोहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने गणेश हाॅल उपलब्ध करून देत लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनची सोय केली आहे. ४५ वर्षा पुढील सर्वच तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब या सह अनेक व्याधींनी पीडित असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे ५०५ व्यक्तींना कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले.

०५ निमसाखर

वालचंदनगर येथील वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या गणेश हाॅल येथे लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

Web Title: Vaccination started in Walchandnagar industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.