बारामती तालुक्यात साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:28+5:302021-09-24T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : शहर आणि तालुक्यातील १ लाख १३ हजार ९६१ नागरिकांना कोरोना लसीकरणाचे दोन डोस देण्यात ...

Vaccination of three and a half lakh citizens in Baramati taluka | बारामती तालुक्यात साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण

बारामती तालुक्यात साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : शहर आणि तालुक्यातील १ लाख १३ हजार ९६१ नागरिकांना कोरोना लसीकरणाचे दोन डोस देण्यात आले आहेत, तर १ लाख ९१ हजार ५४६ नागरिकांना पहिला डोस देण्यात आरोग्य प्रशासनाने यश मिळविले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोससह दोन्ही मिळून एकूण ३ लाख ४ हजार ४६१ डोस देण्यात आले आहेत. एकूण ३ लाख ४० हजार नागरिकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहर आणि तालुक्यातील लसीकरण प्रगतिपथावर असल्याची चिन्हे आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ‘लोेकमत’शी बोलताना माहिती दिली. कोरोना संसर्गाला थांबविण्यासाठी लसीशिवाय कोणताच पर्याय सध्या तरी नाही. अशातच बारामतीकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

बारामती तालुक्यात एकूण ६६ लसीकरण केंद्र आहेत. त्यातील शहरात ११, तर ग्रामीण भागामध्ये ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय सुपा १ व ४८ उपकेंद्र असे मिळून ५८ लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस दिली जात आहे. २१ सप्टेंबर २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे. अनेकदा लसीअभावी लसीकरण थांबले असताना देखील लसीकरण सध्या वेगाने होत आहे. वेळेवर लसी उपलब्ध न झाल्याने बारामती शहर तालुका १०० टक्के लसीकरण होण्यापासुन दूर राहिल्याचे वास्तव आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या ‘कोविशिल्ड’चा साठा पाहता लसीकरणाचा भविष्यात हा आकडा वाढत जाणारा आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा मोलाचा वाटा आहे.

लसीकरण करण्यात आलेले वर्गनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आरोग्य कर्मचारी — पहिला डोस घेणारे ६८८७, दुसरा डोस देण्यात आलेले ५३५६. आघाडीचे कामगार (शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आदी) पहिला डोस देण्यात आलेले ९०१२, दुसरा डोस देण्यात आलेले ८२८२. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पहिला डोस ४३ हजार ४४६, दुसरा डोस देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक ३८ हजार ९३१, ४५ ते ५९ वय असणाऱ्या ६३ हजार ५६० रुग्णांना पहिला डोस दिला आहे. तर, ५२ हजार ९६८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये ५६ हजार ७८४ रुग्णांना पहिला डोस, तर १५ हजार ४६१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर ६८४ दिव्यांग नागरिकांना पहिला डोस, तर ३५४ दिव्यांग नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

चौकट

सद्य:स्थितीतील बारामती शहरातील महिला रुग्णालय, शारदा प्रांगण, नगरपरिषद शाळा क्रमांक ६, शारदानगर, तांदूळवाडी वेस, शाहू हायस्कूल, ७. खंडोबानगर, तारा टॉकीज, कसबा, जळोची शाळा, माता रमाई भवन आदी लसीकरण केंद्र सुरू आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर सुमारे १०० हूनही अधिक लोकांना पहिला व दुसरा डोस एका दिवसामध्ये दिला जात आहे. या आकडेवारीमध्ये खासगी रुग्णालयात दिले गेलेल्या लसींची ही संख्या दिली आहे. डॉ. खोमणे यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण गायकवाड यांनी ही माहिती दिली.

चौकट

गेल्या २४ तासांत बारामती शहर आणि तालुक्यात एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील १६, तर ग्रामीणच्या १५ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण २९ हजार ७३७ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी २९ हजार ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ४० म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तालुक्यातील ३१ जर इतर तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

Web Title: Vaccination of three and a half lakh citizens in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.