जिल्ह्यात साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:10+5:302021-03-18T04:11:10+5:30
पुणे : देशभरात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण ...
पुणे : देशभरात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर ३५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील ६७ टक्के जणांना पहिला डोस तर ६ टक्के जणांना दुसरा डोस दिला आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण समांतररीत्या सुरु आहे. सुरुवातील कोविन अॅपमधील गोंधळामुळे लसीकरण अत्यंत संथ गतीने सुरु होते. सध्या दिवसाला सरासरी ११-१२ हजार जणांना लस दिली जात आहे. लसीकरणाची गती दुपटीने वाढवण्याची अपेक्षा वैैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८९,९७३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३१,३६३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, ५९,६९६ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३६५३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचे सरासरी प्रमाण ७१ टक्के इतके आहे.
राज्यात मुंबईमध्ये आतापर्यंत ५,५९,१२८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ३,३२,९०५ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. देशात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची संख्या साधारणपणे ३० कोटी इतकी आहे. त्यापैैकी केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. ९० टक्के नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. पुढील महिन्याभरात हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर ४५-५९ वयोगटातील कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे लागेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
पुणे जिल्हा लसीकरण आकडेवारी -
पुणे ग्रामीण पुणे शहर पिंपरी चिंचवड एकूण
पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस
सहव्याधी ५१६१ ० ११,७७० ० २७९५ ० १९,७२६
ज्येष्ठ नागरिक २९,४९१ ० ६९,३९१ ० २५,८३३ ० १,२४,७१५
अत्यावश्यक कर्मचारी २४,७७८ २२९६ २५,६६८ ५०१ ९२५० ८५६ ६३,३४९
आरोग्य कर्मचारी ३३,९७२ १२८५८ ३९,९५४ ११,४१० १६,०४७ ७०९५ १,२१,३३६
एकूण ९३,४०२ १५,१५४ १,४६,७८३ ११,९११ ५३,९२५ ७९५१ ३,२९,१२६