पुरंदरमधील तीन गावांत अडीच हजार लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:54+5:302021-08-19T04:13:54+5:30
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण होणे गरजेचे आहे. शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होताना अडचणी निर्माण होत आहेत. ...
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण होणे गरजेचे आहे. शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होताना अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेला मदत म्हणून भारतीय जैन संघटना मदत करत आहेत.
भारतीय जैन संघटना व पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील मांडकी, वाल्हे, आडाचीवाडी या तीन गावांमध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या कॅम्पचे आयोजन दि. १५ व १६ या दोन दिवस केले होते. मांडकी येथील ८१९ व्यक्तींना, वाल्हे येथील एक हजार ५५४ व्यक्तींना तर आडाचीवाडी येथील १९३ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
कोरोनाचे सर्व नियम पाळून मांडकी, वाल्हे, आडाचीवाडी या तीन गावांमध्ये लसीकरण झाले. दोन दिवसांत एकूण २ हजार ५५४ व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे विजय धनवे यांनी दिली. या तिन्ही गावांत प्रत्येकी पाच समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी सर्वेक्षण, जनजागृती, ऑनलाईन नोंदणी आदी काम करत जिल्हा आरोग्य विभागाला व जैन संघटनेला सहकार्य केले. या पाच समितीच्या चांगल्या कामामुळे गावातील बाधित संख्या आता शून्य झाली आहे.
मांडकी (ता. पुरंदर) येथे लोकांनी रांगा लावत, कोरोनाचे नियम पाळत कोव्हक्सिन लसीचा दुसरा डोस घेतला. (छाया : भरत निगडे)