सोळा ऐवजी आठ केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:06+5:302021-01-14T04:11:06+5:30

पुणे : पालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या सोळा लसीकरण केंद्रांपैकी आठ केंद्र राज्य शासनाने निश्चित केले आहेत. शासनाकडून पुण्यासाठी पहिल्या ...

Vaccination will be done at eight centers instead of sixteen | सोळा ऐवजी आठ केंद्रांवर होणार लसीकरण

सोळा ऐवजी आठ केंद्रांवर होणार लसीकरण

googlenewsNext

पुणे : पालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या सोळा लसीकरण केंद्रांपैकी आठ केंद्र राज्य शासनाने निश्चित केले आहेत. शासनाकडून पुण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६० हजार लसी बुधवारी पहाटे प्राप्त झाल्या असून १६ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ८०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

लसीकरणाबाबत अगरवाल यांनी नियोजन बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली असून ६० हजार लसींपैकी ३० हजार लसी देण्यात येणार आहे. शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवकांचा यामध्ये समावेश आहे. त्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. आरोग्य सेवकांना मोबाईल क्रमांकावर लसीकरणाबाबत संदेश दिला जाणार आहे. त्यानंतर लसीकरणासाठी जायचे आहे.

अशाच प्रकारे पहिल्या दिवशी ८०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या दिवशीच्या लसीकरणाची इत्थंभूत माहिती शासनाला पाठवावी लागणार आहे. या आरोग्य सेवकांवर लसीकरणाचे नेमके काय परिणाम होतात यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाची पुढील तारीख निश्चित होणार आहे.

====

आवश्यकता ९० हजारांची मिळाले ६० हजारच

शहरातील ४५ हजार आरोग्य सेवकांनी या लसीसाठी नोंदणी केलेली आहे. प्रत्येकाला लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. याप्रमाणे एकूण ९० हजार लसी मिळणे अपेक्षित होते. परंतु, पुण्याला ६० हजारच लसी मिळाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य सेवकांना लस देताना प्रशासनाचीही कसरत होणार आहे.

====

* पहिल्या टप्प्यात ३० हजार आरोग्य सेवकांना देणार लस

* लसीकरणानंतर शासनाला द्यावी लागणार माहिती

* लस दिलेल्यांवर होणा-या परिणामांवर राहणार लक्ष

* संगणकीय प्रणालीद्वारे लसीकरणाचे लागणार नंबर

* मंगळवारच्या तुलनेत पुण्यात ९० तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४४ रुग्ण वाढले.

====

या ठिकाणी होणार लसीकरण

राजीव गांधी हॉस्पीटल

कमला नेहरु रुग्णालय

ससून हॉस्पीटल

सुतार दवाखाना

दिनानाथ मंगेशकर रुग्णालय

रुबी हॉस्पीटल

भारती विद्यापीठ हॉस्पीटल

नोबेल हॉस्पीटल

Web Title: Vaccination will be done at eight centers instead of sixteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.