पुणे जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत लसीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:09+5:302021-07-03T04:08:09+5:30

पुणे : केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीडलाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन आहे. लसींचा पुरवठा सुरळीत झाला, ...

Vaccination will be done in Pune district till August 31 | पुणे जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत लसीकरण करणार

पुणे जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत लसीकरण करणार

Next

पुणे : केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीडलाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन आहे. लसींचा पुरवठा सुरळीत झाला, तर येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करण्याचा मनोदय आहे. कारण, आपण एका दिवसात १ लाख ३० हजारांपर्यंत लसीकरण केले आहे. तर, दुसऱ्या दिवशी लसींच्या कमतरतेमुळे केवळ ६५ हजार इतकेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसींचा पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. तरच आपण ३१ ऑगस्टपर्यंत लसीकरण करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या ऑक्सिजनची मागणी ३६९ टन आहे. तो तिप्पट करावा. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ही शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. ऑक्सिजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण व्हावे, असे निर्देश पवार यांनी दिले. महानगरासोबतच ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

----

ग्रामीणचे निर्बंध शिथिल होणार ?

पुणे शहर पॉझिटिव्हिटी रेट ४.६ वरून ५.३, पिंपरी-चिंचवड शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ५.१ वरून ५.४ गेला आहे. तर, ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट ७.६ वरून ७.३ वर आला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरीत वाढ होतेय, तर ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील निर्बंध हळुहळू कमी होतील, असे संकेत पवार यांनी या वेळी दिले.

----

मॉल बंदच राहणार

माॅलमध्ये विनाकारण गर्दी केली जाते. तसेच, तिथे सेंट्रल एअर कंडिशनिंग असते. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील माॅल सध्यातरी बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसेच पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

Web Title: Vaccination will be done in Pune district till August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.