लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:39+5:302021-04-04T04:10:39+5:30
अवसरी फाटा येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब ...
अवसरी फाटा येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे आदी उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या, वाढीची कारणे, तालुक्यात असलेली रुग्णांवर उपचाराची सोय, ऑक्सिजन बेड याविषयी माहिती घेऊन प्रशासनाला शासनाच्या निर्देशाप्रमाणे उपाययोजनेबाबत सूचना दिल्या. तालुक्यात होत असलेले सामाजिक, राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ तसेच दशक्रिया विधी यावर लक्ष ठेवून गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच राजकीय कार्यकर्ते मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमात दिसले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत. मार्च महिना व काल अखेर 1132 कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 724 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 29 हजार 853 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. आज अखेर 125 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंचर उपजिल्हा रुग्णालय, अवसरी खुर्द येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील कोविड सेंटर व भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे तर काही खासगी रुग्णालयात कोरोणा रुग्ण उपचार घेत आहेत.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर सर्वत्रच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. होम आयसोलेशनचा पर्याय निवडू नये. होम आयसोलेशनमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, असे डॉ. कोल्हे म्हणाले.