व्यापाऱ्यांच्या कुटुंबासहित कामगारांचेही लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:03+5:302021-04-18T04:11:03+5:30
पुणे: महापालिकेच्या साह्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी आपापल्या कुटुंबासहित कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. यावेळी दुकानांमधील कामगारांचेही लसीकरण करून ग्राहकांंना सुरक्षित ...
पुणे: महापालिकेच्या साह्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी आपापल्या कुटुंबासहित कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. यावेळी दुकानांमधील कामगारांचेही लसीकरण करून ग्राहकांंना सुरक्षित करण्यात आले. पुणे व्यापारी महासंघाने यासाठी प्रयत्न केले.
शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत नूतन मराठी विद्यालय येथे लसीकरण करण्यात आले. २२० जणांना लस देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी व्यापाऱ्यांचे, त्यांच्या कामगारांचे लसीकरण होणे महत्वाचे होते. त्यासाठीच ही मोहीम राबविण्यात आली.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया , मनोज सारडा, लक्ष्मी रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मुनोत प्रशांत टिकार मिठालाल जैन, नितीन काकडे ,राहुल हजारे, मनोज शहा, मिलिंद शालगर, नितीन पोरवाल ,कुमार भोगशेट्टी ,मुझफ्फर इनामदार ,तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याच धर्तीवर सर्व सामाजिक संस्था तसेच मोठी गणेशोत्सव मंडळे यांनी महापालिकेच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवावी. यातून लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होऊ शकेल असे मत प्रशांत टिकार यांनी व्यक्त केले.