लसी संपल्याने पालिकेला बंद करावी लागली स्वतःचीच केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:41+5:302021-04-21T04:12:41+5:30
शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तीन महिन्यात लसींचा पुरवठा सुरळीत करण्यात शासन अद्याप यशस्वी होऊ शकलेले ...
शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तीन महिन्यात लसींचा पुरवठा सुरळीत करण्यात शासन अद्याप यशस्वी होऊ शकलेले नाही. लसीकरण वाढविण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे.
येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. १८ वर्षांपुढील लोकसंख्येचा आढावा घेऊन लसीकरण केंद्रांचे नियोजन केले जाणार आहे.
----
पालिकेच्या शीतगृहात रविवारी १६ हजार ६६३ कोव्हिशिल्ड, तर १७ हजार ७३४ कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध होता. रविवारी रात्री तसेच सोमवारी सकाळी त्याचे रुग्णालयांना वितरण करण्यात आले. त्यानंतर पालिकेला साठा उपलब्ध झाला नाही. मंगळवारी दुपारनंतर ३५ हजार कोव्हिशिल्ड लसी पालिकेला प्राप्त झाल्या.
-----
पुण्यामध्ये १८ वर्षांपुढील नागरिकांचे लोकसंख्येतील प्रमाण ६८ टक्के आहे. यापैकी ६ लाख ९१ हजार ९२७ नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळालेला आहे. तर, ५ लाख ९७ हजार २९४ नागरिकांना पहिला तर ९४ हजार ६३३ नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.