महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गुरुवारपासून लस पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:07+5:302021-04-30T04:13:07+5:30
* आजपासून खाजगी रुग्णालयांना पालिका लस पुरविणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लसीअभावी बुधवारी दिवसभर बंद असलेल्या लसीकरण ...
* आजपासून खाजगी रुग्णालयांना पालिका लस पुरविणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लसीअभावी बुधवारी दिवसभर बंद असलेल्या लसीकरण केंद्रांत आजपासून (गुरुवार) पुन्हा लस उपलब्ध होणार आहे. महापालिकेला बुधवारी रात्री ३० हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून, त्याचा पुरवठा बुधवारी रात्रीच सुरू करण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांना महापालिकेकडून लस पुरवठा होणार नाही. त्यामुळे आलेल्या सर्व लस शहरातील महापालिकेच्या ११४ लसीकरण केंद्रांना समान वितरित करण्यात येणार आहेत. यामुळे महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर पुढील दोन दिवस (गुरुवार, शुक्रवार) लसीकरण सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान महापालिकेकडून आणखी लसीची मागणी वारंवार राज्य शासनाकडे करण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप केंद्राकडूनच मागणी एवढा पुरवठा केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे.