जिल्ह्यात ५४ खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:12 AM2021-03-01T04:12:31+5:302021-03-01T04:12:31+5:30

पुणे : खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सोमवारपासून (१ मार्च) लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. तिस-या टप्प्यात ६० वर्षांवरील ...

The vaccine will be available in 54 private hospitals in the district | जिल्ह्यात ५४ खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणार लस

जिल्ह्यात ५४ खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणार लस

Next

पुणे : खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सोमवारपासून (१ मार्च) लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. तिस-या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. सध्या पुणे ग्रामीणमध्ये ४३, पुणे शहरात ३० तर पिंपरी-चिंचवडमध्ये ८ केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे लसीकरण सुरु आहे. त्यासह पुणे जिल्ह्यामध्ये ५४ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्यामुळे पहिल्या दिवशी ‘वेच अँड वॉच’ची भूमिका घेतली जाणार आहे.

तिस-या टप्प्यातील लसीकरणासाठी शासनाने कोविन २.० या अ‍ॅप्लिेकशनमध्ये नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तांत्रिक बाबींबावत रविवारी संध्याकाळपर्यंत राज्य शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नव्हत्या. त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन ‘वेच अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे समजते. मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे नियोजन करुन लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील केवळ ६५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

-------------

नोंदणी कशी होणार?

ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेता येणार आहे. त्यासाठी सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे अनिवार्य आहे. याबाबत नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे. एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र असलेल्या सहव्याधी रुग्णांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

-----------------------

कोणाला मिळणार लस?

साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले किंवा 45 पेक्षा जास्त वय असलेले आणि गंभीर आजार असलेल्यांना ही लस दिली जाणार आहे.

----------------------------

पुणे ग्रामीणमध्ये ५,९०,००० ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले नागरिक आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांअतर्गत झालेल्या सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी संकलित केली होती. ही यादी दोन दिवसांपूर्वी सर्व ग्रामपंचायतींकडे पाठविली आहे. कोव्हिड पोर्टलवर या नावांची नोंदणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी येताना ‘पिक अँड ड्रॉप’ची सुविधा मिळावी, यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य अधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निधीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका तसेच काही छोट्या बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. त्याबाबत लेखी सूचना सोमवारी काढण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार आहे. खाजगी दवाखान्यात २५० रुपयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. त्यातील १५० रुपये शासन भरणार आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

--------------------------------------

कुठे मिळणार लस? (खाजगी रुग्णालये)

पुणे महापालिका :

गॅलेक्सी केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्वे रस्ता

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एरंडवणे

सुर्या सह्याद्री हॉस्पिटल, कसबा पेठ

श्री हॉस्पिटल, हडपसर बायपास

रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल, खराडी

ग्लोबल हॉस्पिलट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सिंहगड रस्ता

देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डहाणूकर कॉलनी

राव नर्सिंग होम, बिबवेवाडी

श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल, न-हे

पवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे-सातारा रस्ता

भारती हॉस्पिटल, धनकवडी

एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल, हडपसर

औंध इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, औंध

श्वास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, खराडी

--------------------

पुणे ग्रामीण :

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, लवळे

चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल, चाकण-शिक्रापूर रस्ता

शिंगोटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

गेटविल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे-नाशिक महामार्ग

भीमाशंकर हॉस्पिटल, मंचर

डॉ. मते हॉस्पिटल, जुन्नर

अ‍ॅपेक्स हॉस्पिटल, राजगुरुनगर

पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा

पायोनियर हॉस्पिटल, जुना पुणे-मुंबई महामार्ग

अथर्व अ‍ॅक्सिडंट हॉस्पिटल, तळेगाव-चाकण हायवे

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटल, तळेगाव-चाकण रस्ता

मेहता हॉस्पिटल, बारामती-भिगवण रोड

गिरिराज हॉस्पिटल, इंदापूर रस्ता

निरामय मेडिकल फाऊंडेशन, बारामती

योगेश्वरी हॉस्पिटल, शालिमार चौक

महालक्ष्मी हॉस्पिटल, दौंड

कुलकर्णी मेडिकल फाऊंडेशन पिरॅमिड हॉस्पिटल, दौंड-कुरकुंभ रोड

विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर

श्री मयुरेश्वर रुरल हॉस्पिटल, केडगाव

श्लोक हॉस्पिटल, कोंढणपूर फाटा

इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली

केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वाघोली

माऊलीनाथ हॉस्पिटल, शिक्रापूर

लांघे हॉस्पिटल, शिक्रापूर

माऊली हॉस्पिटल, शिरुर

वरदविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, शिरुर-तांदळी रस्ता

सिध्दीविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नसरापूर रस्ता

शिवम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, लोणी काळभोर टोलनाका

युनिक निओनेटल हॉस्पिटल, नगर रस्ता

ओम चैतन्य हॉस्पिटल, आळेफाटा

श्री हॉस्पिटल, आळेफाटा

बारामती हॉस्पिटल, इंदापूर रस्ता

भंडारी हॉस्पिटल, रिंग रोड

पिंपरी चिंचवड :

डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, पिंपरी

लाईफलाईन हॉस्पिटल, भोसरी

लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड

देसाई अ‍ॅक्सिडंट अ‍ँड जनरल हॉस्पिटल, पुणे-नाशिक महामार्ग

ओम हॉस्पिटल, भोसरी

संजीवनी मेडिकल फाऊंडेशन, लोणावळा

अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटल, मोशी-प्राधिकरण

इंद्रायणी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, देवाची आळंदी

Web Title: The vaccine will be available in 54 private hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.