महापालिकेच्या १८६ केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:58+5:302021-07-03T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या १८६ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार ...

Vaccines available at 186 NMC centers | महापालिकेच्या १८६ केंद्रांवर लस उपलब्ध

महापालिकेच्या १८६ केंद्रांवर लस उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या १८६ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, यातील ६० केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी ३० टक्के कोविशिल्ड लस ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस दिल्या जाणार आहेत. तर, ३० टक्के लस हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांना दिली जाणार आहे.

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी २० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (१० एप्रिल पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़

-----

४ जूनपूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

ज्या १८ वर्षांपुढील नागरिकांनी ४ जूनपूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना शनिवारी ५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.

Web Title: Vaccines available at 186 NMC centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.