महापालिकेच्या ८४ केंद्रांवर लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:15+5:302021-07-07T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या ८४ केंद्रांवर बुधवारी लसीकरण केले जाणार आहे. ७८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या ८४ केंद्रांवर बुधवारी लसीकरण केले जाणार आहे. ७८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९ लसीकरण केंद्रांवर उपलब्ध कोविशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ५० टक्के लस आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. तर, ५० टक्के लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे.
अन्य ६० केंद्रांवर कोविशिल्ड साठ्यापैकी ४० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ८४ दिवसांपूर्वी (१४ एप्रिलपूर्वी) पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़.
-----
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस ८ जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.