राखीव कोव्हॅक्सिन लसींकडे बोट दाखवून पुण्याला नाकारल्या जात होत्या लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:45+5:302021-04-10T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्राची कुलकर्णी पुणे : कोव्हॅक्सिन लसींचा राखीव साठा दाखवून केंद्राकडून पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना लसींचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्राची कुलकर्णी
पुणे : कोव्हॅक्सिन लसींचा राखीव साठा दाखवून केंद्राकडून पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना लसींचा पुरवठा नाकारला जात होता, असे उघड झाले आहे.
केंद्राकडून लस पाठविण्याअगोदर उपलब्ध साठ्याची माहिती घेतली जाते. पुणे जिल्ह्यात काेव्हॅक्सिनच्या ६७,५०० लसी शिल्लक आहेत. मात्र, त्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी दुसरा डोस घेतला तरी चालू शकते. मात्र, कोव्हॅक्सिन लस २८ दिवसांनंतरच घ्यावा लागतो. अन्यथा पहिल्या लसीचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे राज्य शासनाने दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन लसी राखीव ठेवल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यांत आत्ताही कोव्हॅक्सिनच्या काही लाख लसी उपलब्ध आहेत. मात्र ५ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार या संपूर्ण लसी दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यास सांगण्यास आले आहे. मात्र या लसीच्या आकड्याकडे बोट दाखवून शिल्लक साठा असल्याने केंद्र सरकारने नव्या लसी कशासाठी द्यायचा, असा सवाल उपस्थित केला आहे.
पुण्यातच ६७००० लसी शिल्लक आहेत. अडचणीच्या काळात या लसी वापरायच्या का, असा सवाल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला विचारला केली होती. मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिला नाही. इतर जिल्ह्यात राखीव ठेवलेल्या लसींची संख्या पुढीलप्रमाणे : अकोला -३६८०, अमरावती- ५८२०, बुलडाणा - ३०४०, वाशिम - ३५२०, यवतमाळ -०, अकोला डीडीएचस - १६१६०, औरंगाबाद - २०८०, हिंगोली - ३५२०, जालना - २००००, परभणी - ९१२०, औरंगाबाद डीडीएसएस - ३४७२०, बीड- १४०८०, लातूर -९६०, नांदेड - ११५२०, उस्मानाबाद - ४१६०, लातूर डीडीएचएस -३०७२०, रायगड - ७२००, ठाणे - ३४७२०, ठाणे डीडीएचएस - ४३०४०, पुणे- ६८३२०, पुणे डीडीएचएस - सातारा - ९२८०.