पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:01 PM2021-06-13T21:01:09+5:302021-06-13T21:01:26+5:30

केंद्रांवर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत.

Vaccines will be available at municipal centers for the first time on Monday (tomorrow) in Pune city | पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

Next
ठळक मुद्देलसीच्या एकूण साठ्यापैकी ६० टक्के कोव्हिशिल्ड लस या ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार

पुणे: महापालिकेने शहरात सुरू केलेल्या १६८ केंद्रांवर उद्या प्रथमच सर्वत्र एकाच दिवशी लस उपलब्ध राहणार असून, या सर्व केंद्रांवर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. तर १६ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसीच्या डोसचा पुरवठाही करण्यात आला आहे. 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध लसीच्या एकूण साठ्यापैकी ६० टक्के कोव्हिशिल्ड लस या ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तर १६ मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाही दुसरा डोस दिला जाणार आहे.

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी दुसरा डोस हा ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने, की ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२२ मार्च पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे. त्यांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित लस ही ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ 

१६ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध 

ज्या नागरिकांनी १६ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़ 

रविवारी लसीकरण बंद 

महापालिकेला राज्य शासनाकडून शनिवारी रात्री उशिरा ११ हजार कोव्हिल्शिड व २ हजार ३०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस प्राप्त झाले. परिणामी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर त्याचे वितरण करता न आल्याने शहरातील महापालिकेच्या सर्व केंद्रांवर रविवारी (आज) लसीकरण पूर्णपणे बंद होते. 

Web Title: Vaccines will be available at municipal centers for the first time on Monday (tomorrow) in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.