वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:41 AM2017-07-29T05:41:11+5:302017-07-29T05:41:18+5:30

शहरात तरुणींना बाहेरून आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शहर पोलिसांत पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

vaesayaavayavasaaya-parakaranai-daoghae-atakaeta | वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघे अटकेत

वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघे अटकेत

Next

बारामती : शहरात तरुणींना बाहेरून आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शहर पोलिसांत पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी मयूर सुरेश ढुके (मूळ रा. वैराग, जि. सोलापूर, सध्या. रा. साईगणेशनगर) याच्यासह हुसेन शाहजहान मुलाणी (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) यांना अटक केली आहे. ढुके हा पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी मुलींना आणत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी अप्पर पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून बारामती पोलिसांसह बनावट ग्राहक आरोपी ढुके याच्याकडे पाठविले. त्यानंतर बनावट ग्राहकाची जळोची मुख्य चौकात आरोपी ढुके याची भेट झाली. यानंतर बनावट ग्राहकासमवेत आरोपी व तीन मुलींना शहर पोलिसांनी पकडले. तिन्ही मुली हातकणंगले (जि. कोल्हापूर), पश्चिम बंगाल येथील आहेत.

Web Title: vaesayaavayavasaaya-parakaranai-daoghae-atakaeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.