वाघोलीतील लसीकरण अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:42+5:302021-05-08T04:11:42+5:30
अखेरीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून आणि सर्वच स्थानिक राजकीय नेत्यांच्या वतीने योग्य प्रकारे नियोजन करुन शुक्रावारी वाघोली प्राथमिक आरोग्य ...
अखेरीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून आणि सर्वच स्थानिक राजकीय नेत्यांच्या वतीने योग्य प्रकारे नियोजन करुन शुक्रावारी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सुरळीत झाल्याचे चिञ पाहायला मिळाले.नागरिकांना व्यवस्थित पणे रांगेत खुर्चीवर बसुन कोणतीही गर्दी न करता टोकन पद्धतीने लसीकरण करुन घेत असल्याचे दिसून आहे. दिवसभरात अंदाजे जवळपास साडेतीनशे नागरिकांना व्यवस्थित रित्या लसीकरण करण्यात आले.
*******************
हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी सांगितले नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध करून देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे परंतु नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे शासकीय नियमांचे पालन होणे गरजेचे आहे असे आवाहन यांनी केले...
........
सर्वांना बरोबर घेऊन एक सकारात्मक मार्ग काढत वाघोली मध्ये यशस्वीरित्या लसीकरण सुरू आहे .यामध्ये सोसायटीधारक ,गाववाले असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना लस उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यानुसार काम चालू आहे.
-आमदार अशोक पवार
.........
वाघोली जो काही लसीकरणावरून गोंधळ झाला याबाबत तात्काळ स्थानिक पत्रकारांनी आवाज उठवल्याने प्रशासनाला जाणीव झाली आणि त्याबाबत त्वरित संबंधितांना आदेश देण्यात आले आणि लसीकरण सुरळीत करण्यात आम्हाला यश आले.
-सचिन एडके (उपजिल्हा आरोग्य अधिकारी)
***चौकट**
दिवसात फक्त तीनशे ते साडेतीनशे लसीचे डोस उपलब्ध होतात यातच अनेक जण जवळच्या व्यक्तींना लस देण्यासाठी फोन करतात तर काही तर समोर येऊन दादागिरी देखील करतात.त्यामुळे लसीकरण करताना काही वेळेस त्रास सहन करावा लागतो.असे कर्मचाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.