वरवंडला तिहेरी अपघातामुळे वाहतुकीची कोंडी
By admin | Published: December 9, 2014 11:36 PM2014-12-09T23:36:12+5:302014-12-09T23:36:12+5:30
वरवंड (ता. दौंड) येथे झालेल्या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Next
वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथे झालेल्या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पुणो-सोलापूर महामार्गावर सुमारे आडीच तास वाहतूक ठप्प झाली होती.
हा अपघात मंगळवारी (दि. 9) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाला. जुने टायर घेऊन जाणारा ट्रक (केए 39-6362) पुण्याहून कर्नाटकाकडे जात असताना वरवंड हद्दीत पुणो-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या परिसरात सोलापूरच्या दिशेने जाणा:या पिकअप गाडीला (एमएच 13 एएन 7893) टायर घेऊन जाणा:या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. दरम्यान पिकअपमध्ये चालक वगळता कोणीही प्रवासी नव्हता; त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच, पिकअपच्या बाजूला उभी असलेली कार (एमएच 12 एफसी 5392) या गाडीला ट्रक आणि पिकअपची धडक बसून तिहेरी अपघात झाला. दरम्यान तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने अपघात होताच मोठा आवाज झाला. तेव्हा परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी आले आणि त्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला सुरुवात केली. (वार्ताहर)
च् पिकअपच्या बाजूला उभी असलेली कार (एमएच 12 एफसी 5392) या गाडीला ट्रक आणि पिकअपची धडक बसून तिहेरी अपघात झाला. दरम्यान तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. पिकअपच्या बाजूला उभी असलेली कार (एमएच 12 एफसी 5392) या गाडीला ट्रक आणि पिकअपची धडक बसून तिहेरी अपघात झाला. दरम्यान, तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले.