१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:13 AM2019-01-25T01:13:32+5:302019-01-25T01:13:37+5:30

पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणा-या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Vakilas threatening to lodge Rs.1 crore 70 lakhs threat | १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी

१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी

Next

पुणे : पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणा-या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषीकेश बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून, जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे; तसेच यात मध्यस्थी करणारा अ‍ॅड़ उमेश शेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस अटक केली होती़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड़ उमेश चंद्रशेखर मोरे (रा़ बालाजीनगर, धनकवडी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची तक्रार दिली होती़ त्यानुसार अ‍ॅड. शेंडे याच्यावर कारवाई करण्यात आली़ त्यानंतर आरोपी ऋषीकेश बारटक्के यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत चौकशी केली़ ही जागा सध्या आमच्या ताब्यात आहे़ या जागेचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्याने ऋषीकेश बारटक्के व शहा यांना राग आला होता़
२७ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते सेंट्रल बिल्डिंग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आले होते़ तेथून परत जात असताना मोरे यांना बारटक्के याने रस्त्यात अडवून तक्रार का दिली, असे विचारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली; तसेच त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकाराने मोरे हे घाबरून गेले होते़ चार-पाच दिवस ही बाब कोणाला सांगितली नाही़ त्यानंतर त्यांनी भीतीपोटी २ जानेवारी रोजी बंडगार्डन पोलिसांकडे अर्धवट तक्रार केली होती़.
या अर्जाची तपासणी केल्यानंतर बुधवारी बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Vakilas threatening to lodge Rs.1 crore 70 lakhs threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.