‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:26 AM2019-02-07T01:26:42+5:302019-02-07T01:27:38+5:30

प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन.

'Valentine Week' starts | ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेला

‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेला

googlenewsNext

- प्रीती जाधव-ओझा

पुणे  - प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन. व्हॅलेंटाइन सप्ताहाची सुरुवात रोझ डे याच दिवसाने होते. या सप्ताहातील पहिला दिवस गुरुवारी आहे. वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे.

प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाब !
पांढरा गुलाब : आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ पे्रमाचे प्रतीक मानला जातो.
लाल गुलाब : लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ हा संदेश गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.
पिवळा गुलाब : माझ्याशी मैत्री करशील काय? हे जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. हे फूल देणे म्हणजे तू माझा जिवलग होतास, होतीस आणि कायमस्वरूपी राहशील. अनोळखी व्यक्तीला हा गुलाब दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.
गुलाबी गुलाब : हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असेल तर त्याला हा गुलाब दिला जातो. तू मला आवडतोस, आवडतेस हा संकेत हे गुलाब देतो.

७ फेब्रुवारी, रोज डे
मन जोडणारे फूल!

प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येक दिवस प्रेमाचाच असतो. पण तरीदेखील व्हॅलेंटाइन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात.
म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फूल देण्यामागचा
अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे
जाणून घेऊ आणि आपणही रंगीबेरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा
करू या.

८ फेबु्रवारी : प्रपोज डे : फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.

९ फेब्रुवारी, चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)
काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो, जो प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.

१० फेब्रुवारी : टेडी डे
जोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांना देखील लोक टेडी बिअर गिफ्ट म्हणून देतात.

११ फेब्रुवारीला : प्रॉमिस डे
प्रेम नेम ही जबाबदारी आणि प्रॉमिसने केला जातो. या दिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.

१२ फेब्रुवारीला : हग डे

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना येते. परंतु या सर्व भावना व्यक्त होण्यासाठी पार्टनरला हग करण्यापूर्वी या टिप्स अमलात आणाव्या :
आधी नजरा मिळवून जरा स्मित करा आणि मग हग करा.
हग अधिक टाईट किंवा लूज नसावे.
हग अधिक वेळासाठी असावे.
आधी स्वत: हग लूज करण्याची पुढाकार घेऊ नये.
मुलींनी गळ्यात हात टाकून हग केले पाहिजे.
मुलांनी कंबरेत हात टाकून हग केले पाहिजे.

१३ फेब्रुवारी : किस डे
व्हॅलेंटाइनच्या एक दिवस आधी किस डे येतो. हा डे जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करता त्याला किस करा. पण हो, त्याच्यासाठी माउथ फ्रेशनर खाणे विसरू नका.

१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे
आता येतो एक स्पेशल दिवस, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला आपले प्रेम प्रदर्शित करता. या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि प्रेमाच्या गोष्टी करा.

Web Title: 'Valentine Week' starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.