वाल्हे येथे तीन दिवसांत १५४२ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:14+5:302021-08-20T04:16:14+5:30

भारतीय जैन संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील वाल्हेसह, आडाचीवाडी, मांडकी येथे देखील कोरोना प्रतिबंधीत लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सुरुवात करण्यात आली ...

In Valhe, 1542 people were vaccinated for the second dose in three days | वाल्हे येथे तीन दिवसांत १५४२ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण

वाल्हे येथे तीन दिवसांत १५४२ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण

Next

भारतीय जैन संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील वाल्हेसह, आडाचीवाडी, मांडकी येथे देखील कोरोना प्रतिबंधीत लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सुरुवात करण्यात आली होती.

भारताचा स्वातंत्र्य दिन असताना, तसेच सार्वजनिक सुट्टी असताना देखील, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, जैन संघटनेचे पदाधिकारी व स्वयंसेवक आदींनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

पहिल्या दिवशी महर्षी वाल्मीकी विद्यालय ९१३ व आडाचीवाडी येथे १८५ असे १०९८

नागरिकांनी कोवॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस घेतला.

लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महर्षी वाल्मीकी विद्यालयात ४४४ नागरिकांनी कोवॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. तर तिसऱ्र्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे येथे ८७ नागरिकांनी कोवॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस घेतला.

महर्षी वाल्मीकी विद्यालयामधील दोन दिवसांच्या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. दोन दिवसांत १५४२ नागरिकांनी कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच महादेव चव्हाण, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सूर्यवंशी, संदेश पवार, किरण कुमठेकर, हनुमंत पवार, अमोल भुजबळ, अतीष जगताप, किरण कुमठेकर, दादाराजे म्हञे, संदीप दाते आदी उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, डॉ. आदित्य धारूडकर, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, औषधनिर्माण अधिकारी शकील तांबोळी, आरोग्य सहाय्यक तानाजी मेटकरी, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: In Valhe, 1542 people were vaccinated for the second dose in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.