वाल्हे पुन्हा करोना हॉट स्पॉट; दोन दिवसात एकाच घरात दहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:12+5:302020-12-23T04:09:12+5:30
सुमारे आठ दिवसापूर्वी वाल्ह्यात एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भिती पसरली ...
सुमारे आठ दिवसापूर्वी वाल्ह्यात एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भिती पसरली . त्यांच्या संपर्कात काही जणांच्या चाचण्या केल्यावर सोमवारी एकाच घरातील दोघांची टेस्ट पाॅझिटीव्ह आली तर मंगळवारी त्याच घरातील तब्बल आठ जणांची टेस्ट पाॅझिटीव्ह आली. त्यामुळे एकाच घरातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने वाल्ह्यात घबराट पसरली. छोट्याशा गावामध्ये एकाच घरातील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्ती किती याचा अंदाज अद्याप आलेला नाही. त्यामुळे वाल्हे गावात कोरोनाची दुसरी लाट येऊन वाल्हे पुन्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
उपाय योजना म्हणून वाल्हे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतिने रुग्ण रहाते ठिकाणी जाऊन औषध फवारणी करुन नीरजंतुकी करण करण्यात आले. संपर्कातील व्यक्तींना होम र्क्वारंटाईन होण्यास सगितले. यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, आरोग्य केंद्राचे डी. बी.राऊत व एन.टी. लव्हाळे घटना स्थळी भेट दिली.