वाल्हेला माऊलींची ग्रामप्रदक्षिणा होणारच
By admin | Published: June 30, 2016 01:39 AM2016-06-30T01:39:28+5:302016-07-02T12:55:27+5:30
वाल्हे येथे माऊलींची प्रदक्षिणा होणार नसल्याचे कळाल्यानंतर वाल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रदक्षिणा होणारच, असा ठराव ग्रामसभेत केला.
वाल्हे : परंपरेनुसार होत असलेली वाल्हे येथे माऊलींची प्रदक्षिणा होणार नसल्याचे कळाल्यानंतर वाल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रदक्षिणा होणारच, असा ठराव ग्रामसभेत केला.
माऊलींची पालखी ४ जुलैैला वाल्हे येथे मुक्कामी येणार आहे. परंपरेनुसार वाल्हे ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन गावातून ग्रामप्रदक्षिणा करून पालखीतळापर्यंत पालखी खांद्यावर नेतात. मात्र ही प्रदक्षिणा होणार नसल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यामुळे बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अनेक ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
परंपरा मोडू नये, लोकांच्या भावनेचा तो भाग असून भावना दुखावू नयेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले. ग्रामप्रदक्षिणा होणारच, असा ठराव मंजूर करण्यात आला.
सोहळ्याला सर्व सुविधा देऊन सहकार्य करण्यात येईल व गावकरी गुढ्या उभारून व रांगोळ्या काढून स्वागत करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, मालक, चालक, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिसांना देणार असल्याचे सरपंच कल्पना गोळे यांनी सांगितले.
या वेळी उपसरपंच पोपटनाना पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सजंय गांधी निराधारचे गिरीश नाना, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, पोलीसपाटील प्रवीण कुमठेकर, सूर्यकांत पवार, चेअरमन मदन भुजबळ, दत्तात्रेय राऊत, ग्रामविकास अधिकारी गाताडे, माऊली भुजबळ, दादा मदने, दीपक कुमठेकर, सचिन देशपांडे, अतिश जगताप, देविदास पांडकर, तुषार भुजबळ, सुहास खवले, सागर भुजबळ, धनंजय पवार, राजेंद्र गायकवाड, दिलीप पवार, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस हवालदार निगडे व संदीप पवार, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)