‘डीएसकेडीएल’च्या अडीच कोटी शेअर्सचे मूल्य शून्य; समभाग मातीमोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 11:30 AM2023-09-10T11:30:04+5:302023-09-10T11:30:25+5:30
कंपनीचे अस्तित्वच संपले, २६ कोटींचा बसला फटका
नितीन चौधरी
पुणे : ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी टॅगलाइन वापरून सामान्यांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ‘डीएसकेडीएल’ कंपनीचे अस्तित्वच संपले आहे. या कंपनीचे सर्व समभाग आता मातीमोल झाले आहेत.
कंपनी अवसायनात गेल्यानंतर जुलैमध्ये मुंबईतील अंशदान प्रॉपर्टीज् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ताबा घेतला. त्यावेळी झालेल्या करारानुसारच डीएसकेडीएल कंपनीतील सहभाग नष्ट करण्याचे ठरले होते. त्यानुसार आता २१ सप्टेंबर रोजी सुमारे अडीच कोटी समभागांची किंमत शून्य झालेली असेल. राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने डीएसकेडीएल कंपनीवर अवसायक म्हणून मनोज कुमार अग्रवाल यांची नियुक्ती केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २५ कोटी ८० लाख १० हजार ९० रुपयांचे प्रत्येकी दहा रुपयांचे २ लाख ५८ हजार ८ समभाग हे शून्य किमतीचे झालेले आहेत.