वाल्हेत पालखीतळाची पाहणी
By admin | Published: June 3, 2017 01:46 AM2017-06-03T01:46:37+5:302017-06-03T01:46:37+5:30
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पहिला मुक्काम असणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखीतळाची पाहणी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाल्हे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पहिला मुक्काम असणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखीतळाची पाहणी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सोबत केली.
या वेळी येणाऱ्या अडचणी सरपंच कल्पना गोळे, माजी सरपंच दत्ता अण्णा पवार, किरण कुमठेकर, पोलीस अधिकारी पिगवले साहेब व ग्रामस्थ यांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये वाल्हे गावातून वाल्मीकी मंदिराकडे आत जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, लाईटची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पर्यायी वाहतूक मार्ग याविषयी चर्चा होऊन ग्रामपंचायतीला संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले.
ग्रामपंचायतींच्या वतीने पालखी तळावरील झाडेझुडपे, गवत, कचरा, जमिनीची लेवल करण्याचे काम चालू केले आहे. या वेळी सरपंच कल्पर्ना गोळे, माजी सरपंच दत्ता अण्णा पवार, ग्रामविकास अधिकारी बी. एस. गताडे, पोलीस अधिकारी पिगवले, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे, सूर्यकांत पवार, किरण कुमठेकर, उद्योजक सुनील पवार, जयवंत भुजबळ, हनुमंत पवार, सुहास खवले, साईनाथ चव्हाण, डॉ. रोहिदास पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या वर्षी ग्रामप्रदक्षिणा झाली नाही. या वर्षी होणार किंवा नाही याबद्दल मात्र माऊलीभक्त संभ्रमावस्थेत असल्याची चर्चा पाहावयास मिळत आहे.
वाल्हे पालखीतळ एक आदर्श पालखीतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. तिची कार्यवाही म्हणून पालखीतळासाठी ६० लाख रुपयाची मंजुरी मिळाली असून त्यामध्ये पालखी चौथरा, स्वागत कमान, संरक्षण भिंत ही प्रायोगिक तत्त्वावर होणार असल्याची माहिती बांधकाम शाखा अभियंता एस. यू. टिळक यांनी दिली.