पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:16 PM2018-01-17T17:16:19+5:302018-01-17T17:19:28+5:30

शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. 

'Vanarai Karandak' has been bagged by Bharat English School and Junior College of Pune | पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’

पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’

googlenewsNext
ठळक मुद्देबालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ ३६ शाळांनी घेतला होता सहभाग, अंतिम फेरीत १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण

पुणे : शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. 
वनराई करंडकाच्या नृत्य-गीत विभागात कात्रजच्या हुजूरपागा स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. पर्यावरणाचे संस्कार रुजविणार व्यासपीठ म्हणजेच ह्यवनराई पर्यावरण वाहिनीची आंतरशालेय पर्यावरण सांस्कृतिक स्पर्धा अर्थात ‘वनराई करंडक’ची नुकतीच बालगंधर्व रंगमंदिर येथे अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ पार पडला.
बालसंभाजीची भूमिका साकारणारे बालकलाकार दिवेश मेदगे, मा. आ. उल्हास  पवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराईचे विश्वस्त आणि ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, रोहिदास मोरे, इंदिरा बेहरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहरे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला. 
यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अंतिम फेरीत १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण झाले.

Web Title: 'Vanarai Karandak' has been bagged by Bharat English School and Junior College of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.