गर्दी वाढल्याने निवडणूक यंत्रणेचा बोजवारा

By admin | Published: July 18, 2015 04:17 AM2015-07-18T04:17:02+5:302015-07-18T04:17:02+5:30

जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्याने निवडणूक

Vandalism of the election system due to increase in crowd | गर्दी वाढल्याने निवडणूक यंत्रणेचा बोजवारा

गर्दी वाढल्याने निवडणूक यंत्रणेचा बोजवारा

Next

पुणे : जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्याने निवडणूक यंत्रणेचा चांगलाच बोजवारा उडाला.
एका अधिकाऱ्याकडे दोन ग्रामपंचयातींची जबाबदारी, अपुरे प्रशिक्षण, स्वीकारलेले अर्ज ठेवण्यासाठी व्यवस्था नाही, अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य, आणि अपुऱ्या सुविधा, पोलीस बंदोबस्ताचा अभाव, यामुळे कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या उमेदवारांची प्रचंड गैरसोय झाली.
हे चित्र जिल्ह्यातील बहुतांश
ठिकाणी होते.
राज्य निवडणूक आयोगाने या वेळी प्रथमच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या वेळी प्रथमच निवडणुकीसाठीचे अर्ज आॅनलाईन पद्घतीने भरण्यात आले, पण ही प्रक्रिया केवळ नावापुरती असल्याचे स्पष्ट झाले असून, आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर पुन्हा सर्व कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देखील अर्ज दाखल करावे लागत आहेत.
पुणे जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि १९६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवशी १३ तारीख पाखली सोहळा, १५, १६ जुलै रोजी आलेली अमावास्या यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळले.
यामुळे चार दिवसांत हेवील तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींसाठी केवळ १९९ अर्ज दाखल झाले. परंतु शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच वेळी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात प्रचंड गर्दी केली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल
करताना केवळ पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येतो, परंतु येथे एका उमेदवाराबरोबर दहा ते पंधरापेक्षा अधिक कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्याला गराडाच घालत होते. (प्रतिनिधी)

तहसीलदार फिरकलेच नाही
हवेली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी धान्य गोदामात अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. या निवडणुकीत तालुक्याची प्रमुख जबाबदारी संबंधित तहसीलदारांची आहे. पंरतु हवेली तालुक्यात शुक्रवारी एवढी गर्दी व गोंधळाची परस्थिती निर्माण होऊनदेखील दिवसभरात ते गोदामाकडे फिरकले नाहीत.

Web Title: Vandalism of the election system due to increase in crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.