अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; रिक्षा, कार, टेम्पो वाहनांचा समावेश, कोथरूडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:22 PM2024-09-25T12:22:40+5:302024-09-25T12:24:55+5:30

आम्ही गाडी चालवून दिवसभर कष्ट करत असतो, अशा प्रकारे नुकसान करणे चांगले नाही, चालकांची प्रतिक्रिया

vandalism of vehicles by unknown persons Incidents in Kothrud involving rickshaws cars tempo vehicles | अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; रिक्षा, कार, टेम्पो वाहनांचा समावेश, कोथरूडमधील घटना

अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; रिक्षा, कार, टेम्पो वाहनांचा समावेश, कोथरूडमधील घटना

कोथरूड : कोथरूड भागातील राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीच्या सहाय्याने वाहन्नाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

यात दोन रिक्षा, कार, टेम्पो अन्य चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या घटनेत वाहनांचे मालक चालक यांचे मोठया् प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षा चालक, टेम्पो चालक, हे दिवसभर गाडी चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या  वाहनांना अशा पद्धतीने तोडफोड केल्याने वाहन चालक मालक हळहळ व्यक्त करत आहेत. या घटना बाबतीत किश्किन्धानगर पोलिसांत नुकसान झालेल्या वाहनाचे मालक यांनी तक्रार केली आहे. 

जिजाऊनगर, सुतारदरा भागात नेहमीच अश्या प्रकारच्या घटना या भागात घडत आहेत. या बाबीची पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते यांनी पुढाकार घेऊन या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे. अशी मागणी परिसरातील सजग नागरिकांनी केली आहे. 

रिक्षा चालवून आम्ही कुटुंबाला हातभार लावतो. आम्ही दिवसभर कष्ट करतो गाडी चालवतो. संध्याकाळी गाडी पार्किंग केली. त्या ठिकाणी कोणीतरी आमच्या वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. आमच्या गाड्याचे नुकसान झाले आहे.  एक वाहन चालक - स्थानिक नागरिक राजमाता जिजाऊनगर कोथरुड.

Web Title: vandalism of vehicles by unknown persons Incidents in Kothrud involving rickshaws cars tempo vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.