बॅनरबाजीमुळे भिगवणचे विद्रूपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:46 AM2018-08-29T00:46:36+5:302018-08-29T00:47:28+5:30
न्यायालयाच्या आदेशाला हरताळ : कारवाई होत नसल्याने नियमभंगाचे प्रमाण वाढले
भिगवण : भिगवण बाजारपेठेतील रस्ते बॅनरबाजी आणि दुकानाच्या जाहिरातींच्या बोर्डाने व्यापून गेलेले आहेत. वारंवार ठराव घेणारी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. न्यायालयाचा आदेशाला हरताळ फासून अनधिकृत बॅनरबाजीला अभय दिले जात असल्याने अशा प्रकाराला प्रचंड उत आल्याचे दिसून येत आहे.
भिगवण बाजारपेठेत आसपासच्या ४० गावे आणि वाडीवस्त्यांवरील नागरिक रोज लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याचे प्रकार बºयाच वेळा घडतात. या वाहतूककोंडीला बºयाच अंशी रस्त्यावर लागलेले बॅनर आणि दुकानाचे बोर्ड कारणीभूत ठरत असून यावर ग्रामपंचायत भिगवणमध्ये ठराव घेऊन पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यांची परवानगी असेल तरच बॅनर लावावेत, असा ठराव घेण्यात आला. तसेच जागामालकाची परवानगी घेत जितके दिवस बॅनर लागणार असेल त्याप्रमाणे भाडे ग्रामपंचायतकडेभरल्या नंतरच परवानगी दिली जाईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, या ठरावाला कचºयाची टोपली दाखवत हायस्कूल, मंदिर परिसर, बाजारपेठेतील रस्ते, इतकेच काय ग्रामपंचायत कार्यालयासमोरही बॅनरबाजी करीत शहराच्या विद्रूपीकरणास सुरुवात केली.
महामार्गावरील जाहिरातबाजी धोकादायक
काही जाहिरातदारांनी पुणे-सोलापूर महामार्गावर बॅनरबाजी सुरू केली. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो, याचे भान ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन तसेच दिवसभर महामार्गावर गस्त घालणाºया महामार्ग प्रशासनाच्या कर्मचाºयांना येत नाही. आपल्या व्यावसायाची जाहिरात झाल्यावर जनतेचे काहीही होवो, आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, अशी व्यावसायिकांची भावनाच यातून समोर येत आहे. ठराव घेतल्यापासून बॅनरबाजी करणाºयांकडून ग्रामपंचायत प्रशासनाकडे किती भाडे जमा झाले, याची माहितीही सर्वसामान्य नागरिकांना मिळणे जरुरीचे आहे. तसेच महामार्गावरील बॅनरमुळे अपघात होवून काही जीवित हानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? तसेच काही झाल्यास याची जबाबदारी निश्चित होणे हे महत्त्वाचे आहे.