Varandha Ghat: वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:42 AM2023-07-21T09:42:56+5:302023-07-21T09:44:20+5:30

अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडतात...

Varandha Ghat road is completely closed for heavy traffic pune latest news | Varandha Ghat: वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद

Varandha Ghat: वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद

googlenewsNext

पुणे : पावसाळ्यामुळे २२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीस पूर्णपणे बंद केला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केली आहे.

वरंधा घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Varandha Ghat road is completely closed for heavy traffic pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.