४५ हजार सात-बारा उताऱ्यात तफावत
By admin | Published: May 23, 2017 05:06 AM2017-05-23T05:06:36+5:302017-05-23T05:06:36+5:30
राज्य शासनाने ई-फेरफार अंमलबजावणी करण्यासाठी सात- बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात जिल्ह्यातील संगणकीकृत सातबाराच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने ई-फेरफार अंमलबजावणी करण्यासाठी सात- बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात जिल्ह्यातील संगणकीकृत सातबाराच्या तपासणीत सुमारे ४५ हजार गट नंबरमधील उताऱ्यांमध्ये तफावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकच जागा एकापेक्षा जास्तवेळा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
ई-फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी संगणकीकृत सातबारा उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी शंभर टक्के जुळणे आवश्यक आहे. शासनातर्फे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात उतारे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातही प्रामुख्याने शिरूर तालुक्यातील सातबारामधील तफावतीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एनए प्लॉट, नियोजित रिंगरोड, महापालिकेच्या हद्दीत जाणारे प्लॉट, पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन अशा जाहिराती करून जागेची विक्री केली जात आहे. कमी पैशांमध्ये शहरालगतच्या गावांमध्ये गुंतवणूक म्हणून जागा खरेदी केल्या जात आहेत.