गुप्ता यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:05+5:302021-06-29T04:09:05+5:30

डॉ. देशबंधू गुप्ता यांच्या सर्वांगीण ग्राम विकास व सामाजिक बांधिलकी या त्याच्या संकल्पनेतून मूळशी व जुन्नर विभागातील गावामध्ये विविध ...

Various activities on the occasion of Gupta's Memorial Day | गुप्ता यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम

गुप्ता यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम

Next

डॉ. देशबंधू गुप्ता यांच्या सर्वांगीण ग्राम विकास व सामाजिक बांधिलकी या त्याच्या संकल्पनेतून मूळशी व जुन्नर विभागातील गावामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. मुळशी विभागामध्ये आंधळे गाव येथे जनावरांचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ११४ जनावरांची तपासणी व लसीकरण करण्यात आले, नांदे गावातील सर्वकुटुंबांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. चांदे गावातील सर्वकुटुंबांना मास्क व सॅनिटायझर वाटप, अंगणवाडी व आशा सेविका यांना पावसाळयासाठी छत्री, मास्क व सॅनिटायझर वाटप, गावातील सर्वकुटुंबांना सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्यांचे बांधकाम, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मा. येथील डॉक्टर त्यांचे सहकारी, आशा सेविका यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. जुन्नर विभागामध्ये आशा सेविका यांना पावसाळयासाठी छत्री, मास्क व सॅनिटायझर वाटप, तळेरान व मुथाळणे येथे फळबाग व वनीकरणाचे ६ हजार ६२० रोपांची लागवड करण्यात आले. तळेरान येथे २० कुटुंबांना परस बागेसाठी बियाणाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि. प. सदस्य देवरामजी लांडे, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, पंचायत समिति सदस्य दिलीप गांजळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, नीलेश जोधळे, संजय धिंदळे, अक्षय तांबे, बाळू बोराडे, झुंबर साबळे उपस्थित होते.

Web Title: Various activities on the occasion of Gupta's Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.