महा ई-सेवा, सेतू केंद्रात मिळणार विविध दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:05+5:302021-08-14T04:14:05+5:30
२० ऑगस्ट २०१९ अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी उत्पन्नाचे दाखले ...
२० ऑगस्ट २०१९ अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. सदर दाखल्यांबाबत प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना दाखले मिळताना कोणतही त्रास अथवा ज्यादा खर्च न होण्यासाठी त्या परिसरातील महा ई-सेवा केंद्र व सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फत उत्पन्नाचे दाखले देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक महा ई-सेवा केंद्र व सेतू सुविधा केंद्र यांनी त्यांचे अखत्यारीत येणाऱ्या गावातील लोकांचे दाखले संबंधित महा ई-सेवा केंद्र व सेतू सुविधा केंद्रांमध्ये स्वीकारणेबाबत सूचना देणेत आलेल्या आहेत. दरम्यान संबंधित मंडळ अधिकारी यांना सदर दाखल्यांबाबत ज्या त्या दिवशी आवश्यक ती चौकशी करणेबाबत व प्रतिज्ञापत्र करणेबाबत सूचना देणेत आलेल्या आहेत. तसेच सर्व तलाठी यांनी त्यांच्या सजेतील लाभार्थ्यांचे दाखले तहसीलदार कार्यालय भोर, संजय गांधी योजना विभागाकडे जमा करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.