जुन्नरमध्ये शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:24+5:302021-07-29T04:11:24+5:30

स्वच्छ जुन्नर, सुंदर जुन्नर ठेवण्यासाठी शहर स्वच्छतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले. ...

Various programs on behalf of Shiv Sena in Junnar | जुन्नरमध्ये शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

जुन्नरमध्ये शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

Next

स्वच्छ जुन्नर, सुंदर जुन्नर ठेवण्यासाठी शहर स्वच्छतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या देशपातळीवरील जुन्नर नगरपालिकेला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असून अग्निशामक सुविधा, रुग्णवाहिका सेवा, स्वर्गरथ सुविधा, शहर स्वच्छता यांमध्ये काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जुन्नर शहराला सार्थ अभिमान असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

एकंदरीतच आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता त्यांचे कौतुक करण्याचा मानस उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, अविनाश कर्डिले, शहरप्रमुख चंद्रकांत डोके, उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, गटनेते समीर भगत, नरेंद्र तांबोळी, भगत संघटक शाम खोत, माऊली होगे, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, कविता गुंजाळ, समीना शेख, युवासेना शहर अधिकारी विशाल परदेशी, उपशहरप्रमुख सलीम मुलानी, मयूर रोकडे, रिजवान पटेल, प्रसिद्धीप्रमुख सोनू पुराणिक, शाखाप्रमुख विनायक गोसावी, अजिंक्य खत्री, संजय खोत, संतोष परदेशी, अभिजित वाघमारे, अथर्व जुंदरे, अजय खोत, राजेंद्र कठाळे, सागर भास्कर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : २८ जुन्नर शिवसेना कार्यक्रम

फोटोओळ : जुन्नर शहर शिवसेनेच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई व छत्री वाटप करताना शरद सोनवणे, नगराध्यक्ष शाम पांडे आदी.

280721\28pun_1_28072021_6.jpg

फोटो क्रमांक : २८ जुन्नर शिवसेना कार्यक्रमफोटोओळ : जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई व छत्री वाटप करताना शरद सोनवने, नगराध्यक्ष शाम पांडे आदी

Web Title: Various programs on behalf of Shiv Sena in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.