विठ्ठलवाडीत आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:16+5:302021-07-21T04:10:16+5:30

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने विठ्ठल मंदिरात पूजा, अभिषेक, व महाआरती गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, पोलीस ...

Various programs on the occasion of Ashadi in Vitthalwadi | विठ्ठलवाडीत आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

विठ्ठलवाडीत आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

Next

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने विठ्ठल मंदिरात पूजा, अभिषेक, व महाआरती गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्या हस्ते झाली.

यावेळी जिल्हाबँकेचे संचालक निवृत्ती आण्णा गवारे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष काळूराम गवारे, उपसरपंच महेंद्र गवारे, माजी उपसरपंच सोपान गवारे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे, सुनील गवारे, युवराज गवारे आदी उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोणाचे सावट असल्याने वारकऱ्यांची संख्या घटल्याचे चित्र दिसून आले. श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, राऊतवाडी, वाबळेवाडी या गावातून पालख्यांसह दिंड्या येतात. यावर्षी देखील दिंड्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे वारकऱ्यांची संख्या कमी प्रमाणात होती. आलेल्या भाविकांसाठी युवराज गवारे, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तन, दिंड्याप्रदक्षिणा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते. आषाढीच्या दिवशी संध्याकाळी ह.भ .प .चैतन्य महाराज शिंदे यांचे कीर्तन आणि रात्री संगीत विशारद पंडित हरीश्चन्द्र गवारे यांच्या सुरेल अभंगाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी लळीत भजनाचा कार्यक्रम, गावप्रदक्षिणा, महाप्रसाद कार्यक्रम व तिसऱ्या दिवशी लाही प्रसादाने आषाढी एकादशीची सांगता. असे आषाढी एकादशीनिमित्त तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

--

फोटो क्रमांक : २०तळेगाव ढमढेरे आषाढी

फोटो ओळ :आषाढी निमित्त विठ्ठलवाडीतील विठ्ठलाची पूजा करताना गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे व महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी नितीन महाजन

200721\20pun_7_20072021_6.jpg

फोटो क्रमांक : २०तळेगाव ढमढेरे आषाढीफोटो ओळ :आषाढी निमित्त विठ्ठलवाडीतील विठ्ठलाची पूजा करताना गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे व महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी नितीन महाजन 

Web Title: Various programs on the occasion of Ashadi in Vitthalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.