नारायणगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:32+5:302021-02-23T04:15:32+5:30

पूर्ववेशीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करून राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. ...

Various programs on the occasion of Shiva Jayanti at Narayangaon | नारायणगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

नारायणगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Next

पूर्ववेशीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करून राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पश्चिम वेस येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, जुन्नर शिवनेरी पायथा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवसंस्कार सादरीकरण व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या तसेच खुला गट वक्तृत्व स्पर्धा विषय जिजाऊ माझ्या नजरेतून व संस्कारशील राजमाता जिजाऊ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा मराठा विकास प्रतिष्ठान जुन्नर व पर्यटन विकास संस्था व मराठा सेवा संघाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कृतिका विनायक लोखंडे यांना पाच हजार एक रुपये रोख मानपत्र व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक तीन हजार एक रुपया मानपत्र व ट्रॉफी ऋचा रामदास उंडे यांस तसेच रुपये ३००१ मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली , तृतीय क्रमांक ईश्वरी सुहास वर्पे रुपये २००१ मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली. उत्तेजनार्थ बक्षीस मारुती जनाजी साबळे निमगिरी यांस रुपये १००१ व सन्मान पत्र व ट्रॉफी देण्यात आली. शिवसंस्कार सादरीकरण व वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांक सुशांत महाराज खैरे पेठ आंबेगाव

द्वितीय क्रमांक योगेश आनंदराव पारुंडे यांना रुपये ३००१ सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात आले.

तृतीय क्रमांक साक्षी भाऊसाहेब घाडगे पिंपळगाव जोगा २००१ रुपये प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. तसेच शिवव्याख्याते शेख सुभान अली अध्यक्ष दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान यांचे मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर जाहीर व्याख्यान झाले .

कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे, लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर विरोबा परिवाराचे बाळासाहेब पाटील धनगरवाडी सरपंच महेश शेळके, उद्योजक अशोक घाडगे, सुधाकर लोंढे, जठार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमचे नियोजन निरंजन भोसले, मल्हार वाजगे ,रुपेश जगताप, राजेश मोरडे, रमेश भोसले, संजय वाजगे, मनोज वाजगे ,विजय डे , प्रवीण पवार , जितेंद्र वाजगे , दीपक वारुळे , दीपक खैरे , राजेश मोरडे , संपत शिंदे धर्मेंद्र वाजगे , प्रशांत वाजगे , मनोज वाजगे , राहुल गरुड , जितेंद्र गुंजाळ , सह्याद्री भिसे यांनी केले .

Web Title: Various programs on the occasion of Shiva Jayanti at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.