रांगोळीतून दिले जातेय विविध सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:13+5:302021-08-14T04:14:13+5:30
रांगोळी काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना आणि रंगसंगतीचे ज्ञान नसताना देखील सकारात्मक ऊर्जेने भारावून गेलेल्या अक्षदा बाबेल यांनी ...
रांगोळी काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना आणि रंगसंगतीचे ज्ञान नसताना देखील सकारात्मक ऊर्जेने भारावून गेलेल्या अक्षदा बाबेल यांनी रांगोळ्या काढायला सुरुवात केली. दररोज एक वेगळी रांगोळी काढली जाऊ लागली. रोजच्या सरावातून विविध रांगोळ्यांचा जन्म झाला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, लेक वाचवा, लेक शिकवा, एड्स, व्यसनमुक्ती, आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, पाणीबचत व भारतीय सण इतर अनेक प्रासंगिक रांगोळ्या काढल्या गेल्या.
रांगोळी काढताना मनातील तणाव कसा नाहीसा होत होता हे देखील कळत नव्हते. त्यामुळे मनातील नकारात्मक भावना जाऊन, दुसऱ्या दिवशी कोणती अधिक चांगली रांगोळी काढता येईल याचा विचार अक्षदा बाबेल यांच्या मनात येऊ लागला. कोरोनाच्या बातम्यांचा मनावर होणारा वाईट परिणाम जाऊन आपण काहीतरी सकारात्मक करू शकतो याची जाणीव त्यांना पदोपदी झाली व यातूनच समाजप्रबोधन करण्याचा त्यांनी संकल्प केला. व्हॉट्सअॅप स्टेटसवर, फेसबुकला अपलोड केलेली रांगोळी अनेकांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवली. या रांगोळ्यांचा अनेकांनी आनंद घेतल्याने अक्षदा बाबेल यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपण जर आपल्यातील कला जोपासली तर आपण नक्कीच नकारात्मक विचार बाजूला सारू शकतो. अनेकांनी आपल्या मनातील आवाज ओळखून एखादी कला जोपासावी व मनामध्ये सकारात्मक विचार ठेवावे हीच भावना यातून मी व्यक्त करत आहे. स्वतः आनंदी राहण्यासाठी, मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी प्रत्येकाने सध्याच्या काळात एखादी तरी कला जोपासणे गरजचे आहे.
अक्षदा रतिलाल बाबेल,
नारायणगाव
१३ खोडद
१३ खोडद १