वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:58 AM2018-07-09T02:58:29+5:302018-07-09T02:59:00+5:30

शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते.

 Vasai, Virar's roads went under water | वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

googlenewsNext

वसई - शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते. पावसाचा जोर कमी जास्त असला तरी रिपरिप सुरुच होती. अधुन मधुन उघडीप देणाऱ्या सरींचा जोर सायंकाळनंतर वाढला होता.
वसई-विरार परिसर पुर्णपणे जलमय झाला असून मुख्य रस्त्यांना नद्यांचे व काही भागात डबक्याचे स्वरूप आले आहे. समाधानाची बाब म्हणजे धरणे तुडूंब भरुन वाहत आहेत. वसईतील नवघर माणिकपूर भागात प्रामुख्याने उमेलमान, चुळणे भागात गुढगाभर पाणी साचले आहे. वसई गावात एस टी डेपो परिसर, किल्लाबंदर, पाचूबंदर तर तिकडे वासळई, तर्खड , निर्मळ तर पार्वती क्रॉस मधील मैदान पूर्ण स्विमिंग पूल झाले होते.
यामध्ये वसई पूर्व भागातील सातिवली, गोखिवरे, महामार्ग भाग तर आद्योगिक वसाहतीत पाणी भरल्याने रविवारी कंपनीत जाणाºया कामगारांचे पूर्ण हाल झाले. याचा विपरीत परिणाम वसई पूर्व-पश्चिम वाहतुकीवर झाला. दुसरीकडे विरार मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. ऐन पावसाळ्यात वसई सहित नालासोपारा विरार भागातील एस टी स्थानक व रेल्वे स्टेशन नजीक पाणी साचून राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या रस्त्यावर नोकरदार मंडळी, व्यापारी यांचे मात्र सतत पडणाºया पावसाने पुरते हाल केले होते. विरार मधील बºयाच ठिकाणी पश्चिम पट्टा, बोळींज, आगाशी पूर्व भागातील मनवेल पाडा, कारगिलनगर, मोरेगाव, एम बी इस्टेट, विवा कॉलेज परिसर आदी भाग संपूर्ण जलमय झाला होता.
या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींनी शहर रचनेला फाटा दिल्याने जागोजागी पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे वसई आणि विरार च्या तुलनेत सर्वत अधिक पावसाचा फटका नालासोपाराभागाला बसतो. पूर्व सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, तुळींज, टाकीपाडा, नालासोपारा बस आगार, संतोष भुवन, नागिनदास पाडा आदी वस्त्यांमध्ये पाणीच पाणी होते तर बहुतांशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. यामध्ये व्यापारी व त्यांची दुकाने, गोडावून यामधील वस्तू, फर्निचर आदींचे मोठे नुकसान झाल्याची ओरड ऐकावयास मिळाली. एकूणच शनिवार-रविवार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची फरफट वाचली.
दरम्यान, शहरातुन होणारी रिक्षाची वाहतूक व दुचाकी यांना रविवारचा दिवसही डोके दुखीचा ठरला. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खाड्या बंद पडल्या होत्या.

विरारमधील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो

आधीच कमी पाणी साठवणुकीची क्षमता असलेले विरार नजीकचे पापडखिंड हे धरण दोन दिवस पडत असलेल्या पावसाने मात्र ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे.

दरवर्षी अगदी डिसेंबरमध्येच या धरणातील पाण्याची पातळी खाली जात असते. मात्र, या वर्षीपासून एक वेगळे तांत्रिक कारण देत महापालिकेने हे पापडखिंड धरण नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून बंद केले आहे.

नवघर-वसई रोड बस आगारात तळेच तळे

सालाबादप्रमाणे
वसई रोड रेल्वे स्टेशनजवळील बस आगारात पावसामुळे मोठाले तळे झाले असून गुडघाभर पाण्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे.

त्यातच याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्थाच नसल्याने दरवर्षी पालिका व एस टी महामंडळ यांच्यात साफसफाईवरून वाद निर्माण होत असतो.

मात्र तरीही या पाण्यातून वाट काढूंन लोकांना पुढे जावे लागते. ही परिस्थिती अशीच कायम आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

Web Title:  Vasai, Virar's roads went under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.