मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 03:33 PM2022-05-01T15:33:51+5:302022-05-01T15:34:40+5:30

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे

Vasant More full stop to talk of MNS quit Will attend the Raj Thackeray meeting in Aurangabad | मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे काल पुण्यात असताना त्यांच्या भेटीसाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु वसंत मोरे न आल्याने त्यांनी मनसे सोडल्याच्या चर्चाना उधाण आले होते. पण आज सकाळी वसंत मोरे औरंगाबादला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यबरोबर ५ ते ६ गाड्यांचा ताफा बरोबर असल्याचे कळाले आहे.    

काल राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी जातीने हजर होते. परंतु या सर्वांमध्ये एका व्यक्तीची मात्र कमी जाणवत होती. ती म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले होते. मात्र वसंत मोरे गैरहजर होते. राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या, पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.
परंतु वसंत मोरे औरंगाबादला रवाना झाल्याने पक्ष सोडणार कि काय या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत वसंत मोरे औरंगाबादला पोहोचतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांचे राजीनामे 

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे यासंदर्भात जी भूमिका घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असं देखील जाहीर केलं होतं. तेव्हा वसंत मोरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर काही मनसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. 

Web Title: Vasant More full stop to talk of MNS quit Will attend the Raj Thackeray meeting in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.