वसंत मोरेंच्या मुलाला गोळी घालण्याची धमकी; तीस लाखांची खंडणी मागितली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:40 AM2023-03-07T10:40:21+5:302023-03-07T10:43:49+5:30

वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली

Vasant More's son threatened to shoot A ransom of 30 lakhs was demanded | वसंत मोरेंच्या मुलाला गोळी घालण्याची धमकी; तीस लाखांची खंडणी मागितली

वसंत मोरेंच्या मुलाला गोळी घालण्याची धमकी; तीस लाखांची खंडणी मागितली

googlenewsNext

धनकवडी : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता, रुपेश मसंत मोरे, (वय २५ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. कात्रज गावठाण) दैनंदिन काम उरकून घरी जात असतानाच अज्ञात मोबाईल वरुन हाँटस अप वर मेसेज आला होता. त्या मध्ये रुपेश यांचा एका मुलीसोबत विवाह झालेबाबतचे नोंदणीचे प्रमाणपत्राचा फोटो होता. व त्या खाली लिहिले होते. "हमने आपके नाम का मॅरेज सटीफिकेट बनाया है, खराडी ऑन आयटी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेट करके कुछ नही होने वाला, इम्तीयाज चाचा ने पहीले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है." असा धमकीचा मेसेज होता. रुपेश यांनी त्याकडे ओके म्हणून दुर्लक्ष केले. त्यानंतर कोणाचा फोन व मेसेज आला नाही. मात्र त्यानंतर तुलाच पैसे देण्यासाठी यावेच लागेल असे सांगून त्या ने रुपेश ला दोन तीन दिवस वारंवार मेसेज करून त्रास दिल्या नंतर रुपेश ने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

यापुर्वीही रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने रूपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती. चिठ्ठीत 'सावध रहा रूपेश' असा मजकूर लिहण्यात आला होता. या प्रकरणाचा अद्यापही उलघडा झाला नसताना या दुसऱ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Vasant More's son threatened to shoot A ransom of 30 lakhs was demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.