वसंतराव पिंगळे यांना पोलीस महासंचालक पदक बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:02+5:302021-05-07T04:12:02+5:30
मंचर: मूळचे श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील व सध्या सीआयडी विभागात एसीपी पदावर कार्यरत असलेले वसंतराव पिंगळे यांना पोलीस दलात ...
मंचर: मूळचे श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील व सध्या सीआयडी विभागात एसीपी पदावर कार्यरत असलेले वसंतराव पिंगळे यांना पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा आणि विशेष कार्य केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेगचे सुपुत्र एसीपी वसंत नारायण पिंगळे यांची १९८८ साली लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. त्यांनी मुंबईमध्ये अतिसंवेदनशील आणि विविध भागात सेवा बजावली. तसेच चार वर्ष तात्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अंगरक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा केली. अँटी ब्युरो करप्शन मध्ये तीन वर्षे कामकाज केले. दहीसर पोलीस ठाणे मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना बऱ्याच गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आले. फोर्स वन विभागात असताना देशद्रोही कसाब याला फाशीची शिक्षा देण्याच्या वेळी मुंबईवरून पुण्याला नेताना सर्वस्वी जबाबदारी त्यांनी योग्यरीत्या पार पाडली. त्यानंतर त्यांची एस.पी. या पदावर नियुक्ती झाली. त्यावेळी अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी पार पाडली व महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने आधुनिक हत्यार ट्रेनिंगसाठी त्यांना इस्राईलला पाठवण्यात आले. वसंत पिंगळे यांनी पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा आणि विशेष कार्य केल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक बहाल झाले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.