जालिंदर कोरडे यांना वसुंधरारत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:24+5:302021-03-05T04:12:24+5:30

यापूर्वी राज्य शासनाने जालिंदर कोरडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोरडे यांनी आपल्या खोडद गावाबरोबरच जुन्नर तालुक्यामध्ये ...

Vasundhararatna Award to Jalindar Korde | जालिंदर कोरडे यांना वसुंधरारत्न पुरस्कार

जालिंदर कोरडे यांना वसुंधरारत्न पुरस्कार

googlenewsNext

यापूर्वी राज्य शासनाने जालिंदर कोरडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविले आहे.

कोरडे यांनी आपल्या खोडद गावाबरोबरच जुन्नर तालुक्यामध्ये वृक्षसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. सुरुवातीला स्वकष्टातून हिरवीगार वनराई निर्माण केली. सध्या पर्यावरणाचा समतोल ढळत असून पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून, निसर्गचक्र असमतोल झाले आहे. यासाठी वसुंधरा हिरवीगार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गावातील ज्येष्ठ मंडळींनी कोरडे यांना वसुंधरा रत्न पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला.

या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अरविंद ब्रम्हे, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे प्रमुख दशरथ भागवत, सविता गायकवाड, रंजना घंगाळे, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष दशरथ गायकवाड, कुंडलिक गायकवाड, जगदंबा पतसंस्था अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उद्योजक जवाहरलाल गुगळे, रमेश गुगळे, मच्छिंद्र गायकवाड, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे हर्षवर्धन भाई, कांता बहन, अलका बहन, लीला बहन, निवृत्ती थोरात, नामदेव काळे, दगडू मुळे, माजी पोलीस पाटील शंकर शिंदे, संभू गायकवाड आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल मुळे यांनी केले.

फोटो - खोडद येथील सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने वसुंधरारत्न या पुरस्काराने वृक्षमित्र जालिंदर कोरडे यांना गौरविण्यात आले.

Web Title: Vasundhararatna Award to Jalindar Korde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.