वाटलूजला वाळूमाफिकांना महसूलदा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:25+5:302021-03-13T04:18:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : वाटलूज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल व पोलिसांच्या ...

Vatluj hit the sand mafika with revenue | वाटलूजला वाळूमाफिकांना महसूलदा दणका

वाटलूजला वाळूमाफिकांना महसूलदा दणका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

दौंड : वाटलूज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल व पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६० लाख रुपये किमतीच्या ४ फायबर बोटी जिलेटिनच्या साहाय्याने महसूलच्या पथकाने नष्ट केल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष शिंदे यांनी दिली. तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या केली.

या प्रकरणी चांद शेख, सलीम शेख (दोघेही राहणार वाटलूज, ता. दौंड), पांडुरंग कवडे (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वाटलूज येथे बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहीती तहसीलदार संजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार महसुल खात्याने पोलीसांबरोबर संपर्क साधून बुधवारी ( दि. १० ) सायंकाळी वाटलूज परिसरात भीमा नदी काठी पोलीस आणि महसुल खात्याने अचानक छापा टाकला. या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळूउपसा सुरु असल्याचे दिसून आले. पोलीस पथक आल्याचे पाहून वाळू चोरटे पळून गेले. याप्रसंगी महसूल खात्याने जिलेटिनच्या सहाय्याने चार फायबर बोटी नष्ट केल्या. या कारवाई पांडुरंग थोरात, असिफ शेख, अमोल गवळी, किरण राऊत, अमोल देवकाते तसेच महसुल खात्याचे मंगेश नेवसे, शशिकांत सोनवणे, सुनिल जाधव, हरिश्चंद्र फरांदे, दादा लोणकर, महेश गायकवाड, विवेक खारतोडे, सचीन जगताप, संदीप सिंगाडे, कुशंत पाटील, अर्जुन स्वामी, आनंद ढगे, संतोष येडुुळे सहभागी झाले होते.

फोटोओळ : वाटलूज (ता. दौंड) येथे बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या.

दौंड / साठ लाखांच्या बोटी नष्ट

[ वाटलुजला भीमा नदीच्या पाञात साठ लाखाच्या चार बोटी नष्ट / महसुल आणि पोलीसांची संयुक्त कारवाई ]

दौंड --- वाटलुज ( ता. दौंड ) येथील भीमा नदी पाञात बेकायदा वाळू ऊपसा करणाऱ्या साठ लाख रुपये किमतीच्या चार । फायबर बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या असल्याची माहीती ठाणे अंमलदार संतोष शिंदे यांनी दिली. तहसीलदार संजय पाटील , पोलीस निरिक्षक नारायण पवार यांच्या ऊपस्थितीत ही कारवाई महसुल आणि पोलीस विभागानने संयुक्तरित्या केली. या प्रकरणी चांद शेख , सलीम शेख ( दोघे ही राहणार वाटलूज , ता. दौंड ), पांडुरंग कवडे ( रा. काञज , ता. करमाळा , जि. सोलापूर ) यांच्यावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वाटलूज येथे बेकायदेशीर वाळू ऊपसा सुरू असल्याची माहीती तहसीलदार संजय पाटील यांना मिळाली होती त्यानुसार महसुल खात्याने पोलीसां बरोबर संपर्क साधून बुधवार ( दि. १० ) रोजी सायंकाळी वाटलूज परिसरात भीमा नदी काठी पोलीस आणि महसुल खात्याने अचानक छापा घातला तेव्हा या ठीकाणी बेकायदा वाळू ऊपसा सुरु असल्याचे दिसुन आले. पोलीस पथक आल्याचे पाहून वाळू चोरटे पळून गेले.याप्रसंगी महसुल खात्याने जिलेटीनच्या सहाय्याने चार फायबर बोटी नष्ट केल्या. या कारवाई पथकात तहसीलदार संजय पाटील , पोलीस निरिक्षक नारायण पवार पोलीस पथकातील पांडूरंग थोरात , असिफ शेख , अमोल गवळी , किरण राऊत , आमोल देवकाते तसेच महसुल खात्याचे मंगेश नेवसे , शशिकांत सोनवणे , सुनिल जाधव , हरिश्चंद्र फरांदे , दादा लोणकर , महेश गायकवाड , विवेक खारतोडे , सचीन जगताप , संदीप सिंगाडे , कुशंत पाटील , अर्जून स्वामी , आनंद ढगे , संतोष येडूळे सहभागी झाले होते.

फोटोओळ / वाटलूज ( ता. दौंड ) येथे बेकायदा वाळू ऊपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या )

Web Title: Vatluj hit the sand mafika with revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.