खोर येथे पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:58+5:302021-06-25T04:09:58+5:30
खोर- देऊळगावगाडा या ठिकाणी महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा करीत वडाच्या झाडाला सप्तपदी फेऱ्या मारत जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी ...
खोर- देऊळगावगाडा या ठिकाणी महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा करीत वडाच्या झाडाला सप्तपदी फेऱ्या मारत जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना केली. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारताना प्रत्येक फेरीत एक शपथ घेण्यात आली. ती अशी- पहिली प्रदक्षिणा आरोग्यासाठी, दुसरी प्रदक्षिणा कणखरपणासाठी, तिसरी प्रदक्षिणा घरातील सर्व नाती जपण्यासाठी, चौथी प्रदक्षिणा आत्म सन्मानासाठी, पाचवी प्रदक्षिणा स्वतःला सिद्ध करण्यासाठी, सहावी प्रदक्षिणा पर्यावरण संवर्धनासाठी, सातवी प्रदक्षिणा कुटुंबातील सर्वांना संघटित ठेवण्यासाठी आहे. आज सणाच्या पार्श्वभूमीवर आज घरोघरी पुरण-पोळीचा नैवेद्य देखील करण्यात आला.
--
फोटो क्रमांक छ : २४ खोर वटपोर्णिमा
फोटोओळ : खोर येथे वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना सुवासिनी.
===Photopath===
240621\24pun_9_24062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक छ : २४ खोर वटपोर्णिमाफोटोओळ : खोर येथे वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना सुवासिनी