वेध विलिनीकरणाचे : भिलारेवाडी १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:09+5:302021-03-21T04:11:09+5:30
.................................... गावकऱ्यांना नागरिकरणाबरोबरच विकासाचे वेध _________________________ दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भिलारेवाडीला चहूबाजूंनी महापालिका क्षेत्र असतानाही अद्याप ...
....................................
गावकऱ्यांना नागरिकरणाबरोबरच विकासाचे वेध
_________________________
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भिलारेवाडीला चहूबाजूंनी महापालिका क्षेत्र असतानाही अद्याप ग्रामपंचायत आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मुलभूत समस्या असून विलिनीकरणानंतर तरी या परिस्थितीत फरक पडेल का, या विवंचनेत गावकरी आहेत.
गावाचे क्षेत्र सुमारे अडीच हजार एकर असून चार हजार लोकसंख्येच्या भिलारेवाडीत ड्रेनेजची अपूरी व्यवस्था आहे. दलित वस्तीत ड्रेनेजची सुविधाच नाही. अन्य भागात सांडपाणी उघड्यावरच सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या वर्षी महापूरात गावातील ड्रेनेज लाइनचे पाईप वाहून गेल्यापासुन सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या आणखीनच तीव्र झाली आहे.
गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे गावातील कचरा हा उपसरपंचांच्या मालकीच्या खासगी जागेवर एकत्रित करून जाळला जातो. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी यंत्रणा असूनही आमचा प्रश्न सुटलेला नाही, असं काही महिलांनी नमूद केले. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी महापालिकेने आम्हाला जागा देऊन प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
गावात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून फक्त वापरण्यासाठी नागरिकांना तलावावर जाऊन पाणी आणावे लागते. पिण्यासाठी पाणी नाही. जेथून पाणी आणतो तिथे जलशुद्धीकरण प्रकल्प नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाणी द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
*कोट*
पायाभूत सुविधांची पूर्तता ग्रामपंचायतीने केली आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला महापालिकेने प्राधान्य द्यावे.
-ताराचंद उघडे, सरपंच.
कोट
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून आम्हाला कात्रजहून पाणी आणावे लागते. त्याचबरोबर गावातील युवकांना व्यायामशाळा आणि रोजगाराच्या संधी महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात.
-राहुल धस, व्यावसायिक
फोटो ओळ
गावातील अगदी मध्यभागी भर लोकवस्तीत उघड्यावरच कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे.