वेध विलिनीकरणाचे : नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:22 AM2021-03-13T04:22:03+5:302021-03-13T04:22:03+5:30

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या गावातील कचरा ...

Vedha Merger: Nanded | वेध विलिनीकरणाचे : नांदेड

वेध विलिनीकरणाचे : नांदेड

Next

नांदेडकरांची ग्रामपंचायतीकडून उपेक्षाच

पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्यामुळे दुर्गंधी

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने एका खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. मात्र गावात स्मशानभूमी, शिवणे-नांदेड पुलानजीक आणि कॅनॉलजवळील जागेवर घाणीचे साम्राज्य असून, त्यातून साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याची मुख्य तक्रार नांदेड ग्रामस्थांनी केली. नांदेड ग्रामपंचायत या समस्येवर वेळकाढूपणा करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

पुणे महानगरपालिकेच्या खडकवासला धरणातून जाणाऱ्या जलवाहिनीद्वारे आम्हाला पाणीपुरवठा होतो, पण त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. जे पाणी येते तेही अपुरे असते. ʻनांदेड सिटीʼला फिल्टर पाणी देता मग आम्हाला का नाही, असा प्रश्न नांदेडकरांसमोर आहे.

सुमारे ७० हजार लोकसंख्येच्या नांदेडमध्ये पाणी आणि कचरा या मुख्य समस्या आहेत. आजूबाजूच्या पाच ते सहा ग्रामपंचायतींना दत्तक घेण्याइतकी नांदेड ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पण स्वतःच्याच गावात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने नागरिक हैराण आहेत. शिवणे-नांदेड पुलाची अवस्था बिकट आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जुनाट असून दोन्ही बाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पुलावरून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. नदीला पूर आल्यावर या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. नदीच्या पुरात आतापर्यंत अनेकजण वाहून गेले असल्याने नव्या पुलाची गरज नागरिक व्यक्त करतात.

मल्लनिस्सारण प्रकल्पासाठी जागा नसल्याने सांडपाणी नदीपात्रातच सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. मोकळी जागा शिल्लक नसल्याने गावाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने तरुणांची गैरसोय झाली आहे.

चौकट

मूळ नांदेड गावाचा (नांदेड सिटी वगळून) समावेश महानगरपालिकेत करावा. पायाभूत सुविधांसाठी महापालिकेने जागा द्यावी. - तुषार कारले, माजी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष.

चौकट

प्रकल्पांसाठी जागा मिळाली तर अनेक प्रश्न सुटतील. महानगरपालिका देते तेवढ्याच सुविधा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देऊ. त्यामुळे महानगरपालिकेत समावेश झाल्याने फार फरक पडेल असं वाटत नाही.

-भारती लगड, सरपंच.

Photo line :

नांदेड-शिवणे पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने तो धोकादायक ठरला असून अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: Vedha Merger: Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.