वैदूवाडीचौकात हेल्मेटसक्ती कारवाई

By admin | Published: November 30, 2014 12:41 AM2014-11-30T00:41:25+5:302014-11-30T00:41:25+5:30

हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी वैदूवाडी चौकात वाहतूक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Vedvadi Chowk Helmets Action | वैदूवाडीचौकात हेल्मेटसक्ती कारवाई

वैदूवाडीचौकात हेल्मेटसक्ती कारवाई

Next
हडपसर : हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी वैदूवाडी चौकात वाहतूक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.  मात्र, याचदरम्यान गांधी चौक, गाडीतळ, आकाशवाणी, मांजरी फाटा या ठिकाणी होणा:या वाहतककोंडीकडे वाहतूक पोलीस अधिका:यांचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली          आहे.
वाहतूक पोलीस नो-पार्किगच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई का करीत नाही, ज्या ठिकाणी कुठलीही सूचना नाही वा फलकही नाही, अशा ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करून वाहनचालकांना का वेठीस धरत आहात, असा सवाल  हडपसरमधील नागरिकांनी केला आहे.
हडपसर आणि मगरपट्टा उड्डाण पुलाखाली अनेक महिन्यांपासून काही वाहने उभी आहेत, ती बेवारस आहेत की कोणाच्या मालकीची आहेत, त्याकडे का लक्ष देत नाही, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत. एखाद्या दुकानदाराने तुमच्याकडे तक्रार केली की, त्याच्या समोरील वाहनांवर लगेच कारवाई करतात. 
तर, दुस:या बाजूला त्याच दुकानदाराने सांगितले ही आमची वाहने आहेत, तर ती सोडून दिली जातात. नगरसेवक वा पदाधिका:याने भ्रमणध्वनीवरून सांगितले की, काहीजणांवर कारवाई केली जात नाही, सामान्यांना मात्र कायदा दाखवला जातो. असा दुजाभाव पोलिसांकडून केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.(वार्ताहर)
 
विद्याथ्र्याची होतेय घुसमट
4गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस असणो गरजचे आहे. सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक, गांधी चौक, गाडीतळ, रवीदर्शन, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनीजवळील कालव्यावरील पूल, लक्ष्मी कॉलनी आदी ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होते. त्याकडे मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणा:या मुलांबरोबर ज्येष्ठ नागरिकांची मोठी घुसमट होत आहे. 

 

Web Title: Vedvadi Chowk Helmets Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.